‘फलज्योतिषासंबंधाने विचारी माणसांचे कर्तव्य’
चित्रमयजगत् जानेवारी १९२१ च्या अंकातील लेखात सत्यान्वेषी लिहितात. “…. एक कमिटी स्थापन करावी व तिने गणित व तर्कशास्त्राचा अभ्यास केलेल्या विद्वानांस या शास्त्राच्या संशोधनाचे कामी निधीतून द्रव्यसाहाय्य द्यावे. या शास्त्राचा शोध करणारांस तर्कशास्त्राचे ज्ञान असणे का इष्ट आहे हे उघड आहे. कोणत्या नियमास अनुसरून सिद्धान्त केलेला खरा असतो, सिद्धान्त चूक राहू नये यास्तव कोणते दोष …